उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ‘रालोआ’चे जगदीप धनखड विजयी !
नवी देहली – देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपती पदासाठी ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (‘रालोआ’चे) उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.