हुगळी (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या मोर्च्यावर आक्रमण
पोलिसांकडून भाजपच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !
हुगळी (बंगाल) – येथे भाजपकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्च्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण करून कार्यकर्त्यांना मारहाण केली. लाठ्या-काठ्यांद्वारे हे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याऐवजी भाजपच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक केली. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचे आमदार मुझुमदार यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
#Breaking || ‘Shame’: #TMC MLA #AsitMajumdar‘s clash with #BJP workers prompts fury, Opposition leaders slam #MamataBanerjee govthttps://t.co/iLozPQNE3Q
— TIMES NOW (@TimesNow) August 6, 2022
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे, हे भारतातील लोकशाहीवाद्यांना दिसत नाही का ? केंद्र सरकारने तात्काळ बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे ! |