रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !
१. आश्रमातील सकारात्मक स्पंदने वाढल्याचे जाणवणे : ‘यापूर्वी मी आश्रमात आलो असतांना मला इमारतीच्या प्रवेशद्वारापासून सकारात्मक स्पंदने जाणवली होती; मात्र या वेळी मला आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच सकारात्मक स्पंदने जाणवली. ती सकारात्मक स्पंदने माझ्या छातीतून शरिरात प्रवेश करत असल्यामुळे हृदयाच्या ठिकाणी मला संवेदना जाणवत होत्या. माझी अनुभूती मी शब्दांत मांडू शकत नाही.’ – अधिवक्ता खुश खंडेलवाल (संस्थापक, हिंदु टास्क फोर्स), ठाणे, महाराष्ट्र.
२. ‘आश्रम पहाणे’, हे माझ्यासाठी पुष्कळ लाभदायक ठरले. येथील माहिती सर्व हिंदूंसाठी अत्यंत आवश्यक आहे.’ – पूजा व्ही., धारवाड, कर्नाटक.
३. ‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. येथे प्रत्येक पावलाला सूक्ष्म स्पंदनांचा अनुभव घेता येतो.’ – श्री. विशाल जाधव, धारवाड, कर्नाटक.
४. ‘आश्रमात मन आणि आत्मा यांना पुष्कळ शांती मिळते. येथील सर्व गोष्टी चांगल्या असून त्या प्रेरणादायी आहेत.’ – श्री. ललित कुमार (राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु जन शक्ती), तेलंगाणा, आंध्रप्रदेश.)
|