१२ ऑगस्ट या दिवशी असलेल्या ‘संस्कृतदिना’च्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेली स्वभाषाभिमान वाढवणारी ग्रंथसंपदा घरोघरी पोचवा !
साधकांसाठी सूचना
१. संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये
‘१२.८.२०२२ या दिवशी ‘संस्कृतदिन’ आहे. संस्कृत म्हणजे हिंदु संस्कृतीचा पवित्र आणि अभिमानास्पद वारसा ! संस्कृत भाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. संस्कृत सुभाषिते आणि श्लोक हे या भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. ही सुभाषिते आणि श्लोक न्यूनतम शब्दांत एखाद्या विषयाचा अर्थपूर्ण आशय सांगून जातात.
२. विदेशात संस्कृत भाषा शिकण्यास प्राधान्य दिले जाणे, तर भारतात संस्कृतची गळचेपी होणे
‘विश्वातील सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत’, असे लक्षात आल्यावर विदेशातील बर्याच विद्यापिठांमध्ये संस्कृत भाषा शिकवण्यात येते. तेथील विद्यार्थीही संस्कृत भाषा आवडीने शिकून घेत आहेत. विदेशातील अनेक विचारवंत ‘संस्कृत भाषा बोलल्याने काय लाभ होतात ?’, हे स्वतः अभ्यासत आहेत.
‘जेथे पिकते, तेथे विकत नाही’, या म्हणीप्रमाणे भारतात संस्कृतला गौण स्थान दिले गेले आहे. संस्कृतला ‘मृत भाषा’ म्हणून हिणवले जात आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यास भारतातील शिक्षणखाते फारसे उत्सुक नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी संस्कृत न शिकता इंग्रजी भाषा शिकण्यात धन्यता मानतात.
३. सनातनने स्वभाषाभिमान वाढवणारी ग्रंथसंपदा प्रकाशित करणे
देवभाषा संस्कृतनंतर ‘मराठी’ हीच सर्वांत सात्त्विक भाषा असून महाराष्ट्रात ‘मराठी’ भाषेची गळचेपी केली जात आहे. या दोन्ही भाषांविषयी निर्माण झालेली समाजमनाची अनास्था दूर व्हावी, यासाठी सनातनने स्वभाषाभिमान वाढवणारी ग्रंथमालिका प्रकाशित केली आहे. त्यामध्ये संस्कृत आणि मराठी या भाषांची वैशिष्ट्ये विशद केली आहेत.
४. सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ
५. भाषेविषयीच्या ग्रंथांचे संच सवलतीच्या दरात उपलब्ध !
संस्कृतदिनाच्या निमित्ताने साधकांनी वरील ग्रंथ अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवून सर्वांमध्ये स्वभाषाभिमान निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत.
साधकांनी या ग्रंथांची मागणी जिल्ह्यातील स्थानिक वितरकांकडे करावी. जिल्हा वितरकांनी वरील ग्रंथांवर सवलत द्यावी. वितरकांकडे सदर ग्रंथ उपलब्ध नसल्यास त्यांनी मागणी पुरवठा विभागाकडे या ग्रंथांची मागणी करावी.’