नागपूर येथे ‘स्वाईन फ्ल्यू’च्या संसर्गात वाढ, तिघांचा मृत्यू !
नागपूर – शहरात ‘स्वाईन फ्ल्यू’चा संसर्ग वाढत असून शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे ४६ रुग्ण भरती झाले आहेत, तर आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघे ‘व्हेंटिलिटर’वर आहेत, अशी माहिती महापालिकेने ५ ऑगस्ट या दिवशी दिली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत आतापर्यंत ‘स्वाईन फ्ल्यू’चे ७५ रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यांतील सर्वाधिक ४५ रुग्ण हे जिल्ह्यातील शहरी भागातील आहेत, तर २४ रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील भागातील आहेत.