प्रेमळ आणि सेवेची तळमळ असलेल्या पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल केतन पाटील !
१. प्रेमभाव
अ. ‘स्नेहलताईमधील प्रेमभावामुळे तिच्याशी व्यष्टी आणि समष्टी साधना, तसेच वैयक्तिक, अशा कोणत्याही सूत्राच्या संदर्भात मोकळेपणाने बोलता येते.
आ. माझ्याकडून सेवेत झालेली एखादी चूक ताईला सांगितली, तर ताई पुष्कळ प्रेमाने त्या चुकीमुळे झालेले परिणामही समजावून सांगते. त्यामुळे मला ताण येत नाही. पुढील प्रयत्नांना दिशा मिळते.
इ. अनेक वेळा सेवेतील बारकावे माझ्या लक्षात येत नाहीत; पण ताई ती सूत्रे वेळोवेळी तितक्याच प्रेमाने माझ्या लक्षात आणून देते.
२. ताईच्या प्रयत्नांमुळेच कार्यकर्त्यांचे प्रयत्न संघभावाने चालू असणे
सेवेत एखादे नवीन सूत्र आल्यास ताई त्वरित आमच्याशी चर्चा करून त्याविषयीचे नियोजन करते. त्यामुळे समन्वयकांमध्येही जवळीक निर्माण झाली आहे. ताईच्या प्रयत्नांमुळेच कार्यकर्त्यांचे संघभावाने प्रयत्न चालू आहेत.
३. कितीही कठीण प्रसंग घडला, तरी ‘ताईच्या सेवेवर परिणाम झाला किंवा एखादे सूत्र सुटले’, असे कधीच होत नाही.
४. समजूतदार
लहान वयातही स्नेहलताईमध्ये पुष्कळ समजूतदारपणा आहे. तिच्याशी कोणत्याही विषयावर बोलले, तरी ती समजून घेऊन योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन देते.’
– सौ. तृप्ती पुळूजकर, सोलापूर- ( मे २०२२)