खारघर (नवी मुंबई) येथे धर्मांधांकडून वृत्तपत्र छायाचित्रकाराला डांबून ठेवून टँकरखाली चिरडण्याची धमकी !
नवी मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) – खारघर येथे एका अनधिकृत ढाब्यावर सिडकोने केलेल्या कारवाईचे छायाचित्र काढणार्या वृत्तपत्र छायाचित्रकाराला डांबून ठेवून टँकरखाली चिरडण्याची धमकी धर्मांध ढाबा चालकाकाडून देण्यात आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ढाबाचालक सोहेल पटेल, तौशीफ पटेल आणि कामगार प्रतीक रेवणे यांना कह्यात घेऊन न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नोटीस देऊन सोडण्यात आले; परंतु दोन दिवसांनी त्यांना अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली.
खारघरमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत ढाबे चालू आहेत. या प्रकरणी वारंवार वृत्त आल्यावर सिडकोने दोन दिवसांपूर्वी टाटा रुग्णालयासमोरील ढाब्यावर कारवाई केली. दैनिक ‘सकाळ’चे छायाचित्रकार के.सी. सिंह या कारवाईची छायाचित्रे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी ढाबाचालक पटेल आणि त्याचे साथीदार यांनी छायाचित्रकार सिंह यांना ढाब्यामध्ये डांबून ठेवले. त्यानंतर सिंह यांच्या खिशात पैसे ठेवून त्यांचे छायाचित्र काढले आणि ‘तुम्ही हप्ता घेतला असल्याचे हे छायाचित्र प्रसारित करून तुमची अपकीर्ती करू’, अशी उलट त्यांनाच धमकी दिली. यासह ‘यापुढे त्रास दिल्यास (वृत्त दिल्यास) डंपरखाली चिरडून टाकू’, अशी धमकी या धर्मांधांनी सिंह यांना दिली.
सर्व पत्रकारांनी या घटनेचा निषेध करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअनधिकृत गोष्टी करून वर ‘आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही’, या वृत्तीमुळे धर्मांध मुजोर झाल्याचे दिसून येत आहे. अशांवर वेळीच कठोर कारवाई झाली, तरच याला आळा बसेल ! |