रामनाथी आश्रमात आल्यावर वडूज, जिल्हा सातारा येथील सौ. माधवी महेश कोकाटे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने चैतन्यदायी रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या चरणी येण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. मला आश्रमातील सर्व वस्तूंकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवत होता.
२. आश्रमात सेवा करतांना माझा नामजप आणि प्रार्थना आपोआप होत होत्या.
३. ‘आश्रमातील प्रत्येक साधकाकडे पाहून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि ‘प्रत्येक साधक सनातन परिवारातील आहे’, असे मला वाटले.
४. आश्रमातील साधकांच्या समवेत सेवा करतांना मी त्यांच्यामधील ‘काटकसरीपणा, नियोजनबद्धता, शिस्त आणि प्रेमभाव’ हे गुण अनुभवले.
५. ‘मी श्रीकृष्णाच्या गोकुळात रहात आहे’, याची सतत माझ्या मनाला जाणीव होत होती.
६. मी ‘आश्रमातील चैतन्य आणि गुरुदेवांची कृपा’ यांमुळे समाधान अन् आनंद अनुभवू शकले. ‘हा आनंद केवळ आश्रमातच मिळू शकतो’, याची मला जाणीव झाली.’
– सौ. माधवी महेश कोकाटे, वडूज, खटाव, जिल्हा सातारा. (२३.६.२०२२)
दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेल्या नातेवाइकांमध्ये गुरुकृपेने पालट होणे
‘दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. त्या वेळी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सत्संगाच्या माध्यमातून सर्व नातेवाइकांना साधनेविषयी माहिती समजली. सर्व नातेवाईक ‘ऑनलाईन’ सत्संगात नियमितपणे उपस्थित रहात होते. त्यामुळे त्यांना चांगल्या अनुभूती आल्या आणि पुढे ते प्रासंगिक सेवा करू लागले. त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले अन् त्यातून मला आनंद मिळाला. ‘आपण एक पाऊल पुढे गेलो, तर गुरुदेव आपल्याला १० पावले पुढे नेतात’, हे मी अनुभवले. माझ्या नातेवाइकांमध्येही पुष्कळ पालट झाले. ‘गुरुदेवा, हे सर्व सत्संगामुळे घडू शकते’, याची मला जाणीव होऊन सत्संगाचे महत्त्व माझ्या लक्षात आले’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. माधवी महेश कोकाटे, वडूज, खटाव, जिल्हा सातारा. (२३.६.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |