प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) सनातनच्या १२० व्या संतपदावर विराजमान !
पुणे, ५ ऑगस्ट (वार्ता.) – प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्याची आनंदवार्ता सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट या दिवशी दिली. सद्गुरु स्वाती खाडये या पू. (श्रीमती) शहाआजी आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेटण्यासाठी त्यांच्या वाई येथील रहात्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (श्रीमती) मालती शहा यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र, तसेच शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. ‘या आनंदवार्तेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कृपाशीर्वादच दिला आहे’, असा भाव तेथील साधकांमध्ये जाणवला.
सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित करत आहोत.