श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभल्यावर श्री. प्रदीप वाडकर यांचे मन उत्साही आणि आनंदी होणे
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटल्यावर मनाला उत्साह जाणवून आनंद होणे
एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला उत्साह जाणवून आनंद वाटला. मी त्यांच्याशी काहीही न बोलता केवळ त्यांच्या सत्संगाने माझ्या मनाला उत्साह जाणवला.
२. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील सकारात्मकता, त्यांचा गुरुदेवांप्रती असणारा भाव आणि श्रद्धा यांचा इतरांवर परिणाम होतो’, हे लक्षात येऊन ‘त्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करायला हवेत’, असे वाटणे
माझ्या लक्षात आले की, मी अन्य कार्यकर्त्यांकडे गेल्यावर मला अशी मनाची स्थिती अनुभवता येत नाही. त्या संदर्भात चिंतन केल्यावर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील सकारात्मकता, त्यांचा गुरुदेवांप्रती असणारा भाव आणि श्रद्धा यांमुळे सर्वांवर त्याचा परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘मीही साधनेचे प्रयत्न करून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंसारखे बनायला हवे. मी सदैव सकारात्मक रहायला हवे. माझ्या सहकार्यकर्त्यांनाही असेच सकारात्मक वाटायला हवे’, असे मला वाटले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रमाणे सकारात्मक रहाण्यासाठी प्रयत्न केल्यावर आलेली अनुभूती
त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंसारखे सकारात्मक रहाण्यासाठी प्रयत्न केल्यावर मला एकाच वेळी अनेक सेवा आल्या, तरी ‘माझे मन शांत आणि स्थिर राहून सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
४. मी वरील अनुभूती एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘यावरून ‘संतांचे महत्त्व किती आहे ?’, ते लक्षात येते.’’
५. प्रार्थना
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी मी शरणागतीने प्रार्थना करतो की, माझ्याकडून साधनेचे असेच प्रयत्न होऊ देत आणि माझी आध्यात्मिक प्रगती होऊ दे.’
– श्री. प्रदीप वाडकर (७.७.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |