उत्तरप्रदेशमध्ये एजाजने हिंदु महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर केले !
पीडित महिलेच्या मुलीचेही केले लैंगिक शोषण !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील मलिहाबाद भागातील एजाज नावाच्या धर्मांध मुसलमानाने किराणा दुकान चालवणार्या एका हिंदु महिलेवर बलात्कार केला. त्याने या घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला धमकावले आणि तिच्या मुलीचेही अनेक वेळा लैंगिक शोषण केले. नंतर त्या दोघींचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. एके दिवशी महिलेने धाडस करून तिच्या पतीला याविषयीची माहिती दिली. पतीने याविषयी एजाजला धमकावल्यावर त्याने बंदुकीचा धाक दाखवून पतीला गप्प बसवले. शेवटी कंटाळून महिलेने पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेऊन एजाजला अटक केली आहे.
एजाज ने महिला का रेप किया, फिर नाबालिग बेटी का भी यौन शोषण: दोनों को बना दिया मुस्लिम, अश्लील वीडियो के सहारे ब्लैकमेल#Lucknow #Rapehttps://t.co/UENrik2W1p
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 4, 2022
एजाज हा हिंदु पीडितेच्या घराजवळच रहातो. तो तिच्या दुकानातून सामान घेत असे. एके दिवशी महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून तो तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडून ३ लाख रुपयांचे दागिनेही हडपले.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदे असूनही त्यांची प्रभावी कार्यवाही होत आहे का ? असा प्रश्न वारंवार घडणार्या अशा घटनांतून निर्माण होतो. अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना त्वरित आणि कठोरात कठोर शासन केल्याखेरीज अशा घटना थांबणार नाहीत ! |