वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – अपकीर्ती करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी खानोली येथील युवकावर गुन्हा नोंद
वेंगुर्ला – अश्लील छायाचित्रे काढून अपकीर्ती करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी धनगरवाडी, खानोली येथील किशोर वरक (वय ३२ वर्षे) याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरक याने माझ्याशी प्रेमपूर्वक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अश्लील छायाचित्रे काढून ‘आई-वडिलांना दाखवून अपकीर्ती करेन’, अशी धमकी देत त्याने घरी नेऊन मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘सायबर सेल’च्या माध्यमातून अन्वेषण केले आणि पुरावे आढळल्यानंतर वरक याच्यावर अत्याचार करण्यासह अश्लील छायाचित्रे प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला. वरक सध्या पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संपादकीय भूमिकासमाजाला धर्मशिक्षण न दिल्याने नीतीमत्ता अधोगतीला गेल्याचे उदाहरण ! |