‘टीईटी’ परीक्षेमध्ये अपप्रकार केलेल्या ७ सहस्र ८७४ उमेदवारांची सूची घोषित !
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या ७ सहस्र ८७४ उमेदवारांची सूची परीक्षा परिषदेने घोषित केली असून संबंधित उमेदवारांची ची प्रमाणपत्रे रहित करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घातला आहे. पुणे पोलीस आरोग्य भरती परीक्षेतील अपप्रकारांचे अन्वेषण करत असतांना त्यातून टीईटी घोटाळा उघडकीस आला होता. परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणार्या खासगी आस्थापनाचे संचालक आणि उमेदवार यांचा यात सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. निकालामध्ये अपात्र असलेल्या उमेदवारांनी अपप्रकार करून स्वत:ला पात्र करून घेतल्याचेही आढळले आहे.
संपादकीय भूमिकाअसे अपप्रकार करून पात्र होणारे शिक्षक विद्यार्थ्यांना नीतीमत्तेचे धडे काय देणार ? |