देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. अहं अल्प असणे
‘श्री. संजीवकाका प्रतिष्ठित उद्योगपती आहेत; परंतु त्याविषयी त्यांना अहंभाव नाही. काही दिवसांपूर्वी श्री. संजीवकाका आणि सौ. मालाकाकू रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा मी त्यांच्यासाठी महाप्रसाद वेगळा काढून ठेवला होता आणि महाप्रसादानंतर त्यांची भांडी धुण्यास मागितली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आमच्यासाठी वेगळे असे काहीच करू नका. आम्ही आश्रमात आलो आहोत, तर आम्हालाही आश्रमजीवन अनुभवू द्या. अन्य साधकांचे जसे असते, तसेच आमच्यासाठीही असू दे.’’ यावरून ते इतके प्रतिष्ठित असतांना आणि त्यांच्या घरी नोकर असतांनाही आश्रमात त्यांनी स्वतःचे ताट स्वतः धुतले.
२. त्या दोघांच्या मनात गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव आणि साधकांविषयी आत्मीयता आहे. त्यामुळे त्यांची सेवा करतांना माझे मन स्थिर झाले.
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला अशा गुरुभक्तांच्या सेवेची संधी लाभली आणि त्यांच्यातील भाव अन् समर्पण यांची जाणीव झाली’, त्याबद्दल मी गुरुदेव आणि श्रीमन्ननारायण यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. किरण व्हटकर (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१२.२०२१)
(टीप : हे लिखाण पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचे संतपद घोषित होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार असा केला आहे.)