पू. संजीव कुमार यांनी साधनेविषयी सांगितलेली काही मौलिक सूत्रे !
‘एक दिवस पू. संजीवभैय्या (पू. संजीव कुमार, देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत) यांच्याशी सत्संगाविषयी बोलत असतांना मी त्यांना विचारले, ‘‘साधनेचे प्रयत्न कसे वाढवायचे ?’’ तेव्हा त्यांनी मला केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. श्री गुरूंना शरण गेल्यावर साधनेचे वेगळे प्रयत्न करावे न लागता साधना हा जीवनाचा एक भागच होऊन जाणे
पू. संजीवभैय्या मला म्हणाले, ‘‘सर्वकाही गुरुकृपेनेच होते. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते. आपल्याला केवळ श्री गुरूंना शरण जायचे आहे. शरणागतीनेच मनोलय होतो. केवळ आपली श्री गुरूंवर श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. आपला मनोलय होतो, तेव्हा ईश्वर आपल्या मनात येऊन काहीही करवून घेऊ शकतो. मनोलय झाल्यावर सर्वकाही अगदी सोपे होऊन जाते. साधनेसाठी वेगळे प्रयत्न करावेच लागत नाहीत. साधना हा जीवनाचा एक भागच होऊन जातो.
२. पू. (सौ.) माला कुमार (पू. संजीवभैया यांच्या पत्नी) यांच्या आई आणि आजी दोघीही पुष्कळ चांगली साधना करत होत्या. त्यांचे जीवनच साधनामय होते.’’
गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मला पू. संजीवभैय्यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गुरुदेवांच्या श्रीचरणी आणि सर्व सद्गुरु अन् संत यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मनीषा माहुर, देहली (८.१.२०२२)