शिकण्याची वृत्ती असलेल्या आणि भावपूर्ण सेवा करणार्या सनातनच्या ११६ व्या समष्टी संत पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६८ वर्षे) !
सनातनच्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांचा वाढदिवस श्रावण शुक्ल अष्टमी (५.८.२०२२) या दिवशी आहे. त्यानिमित्त देहली येथील साधकांनी पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. (सौ.) माला संजीव कुमार यांना सनातन परिवाराच्या वतीने ६८ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. श्री. अभय वर्तक
१ अ. ‘पू. माला कुमार सतत हसतमुख असतात.
१ आ. त्या ६७ वर्षांच्या असूनही त्यांचा तोंडवळा एखाद्या निरागस बालकाप्रमाणे दिसतो.
१ इ. ‘पू. (सौ.) माला या त्यांचे पती पू. संजीव कुमार यांच्याशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटते. पू. संजीव कुमार यांच्यासारखीच पू. माला कुमार यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.’(११.१.२०२२)
२. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
२ अ. प्रीती
१. देहली येथे होणार्या ‘विश्व पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथांचा वितरणकक्ष असतो. त्या काळात पू. संजीव कुमार यांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी पू. (सौ.) माला कुमार वितरणकक्षावर सेवा करणार्या सर्व साधकांना मोठ्या प्रेमाने ‘चॉकलेट’ देतात. त्या घरून एखादा चांगला पदार्थ करून आणून साधकांना देतात.
२. ‘आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि रिक्त हस्ते परत आलो’, असे कधीच झाले नाही.
२ आ. शिकण्याची वृत्ती : पू. माला कुमार माझ्यापेक्षा वयाने आणि साधनेत मोठ्या असूनही त्या मला म्हणतात, ‘‘प्रणवभैय्या, साधनेविषयी मला काही सांगा.’’ यातून त्यांच्यातील ‘शिकण्याची वृत्ती आणि नम्रता’ या गुणांचे दर्शन होते.
२ इ. सेवेचा ध्यास : त्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण तळमळीने करतात. त्या वितरणाची सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करतात. त्या सात्त्विक उत्पादने किंवा ग्रंथांचे संच यांची बांधणी चांगल्या प्रकारे करतात.’ (१३.१२.२०२१)
३. कु. पूनम चौधरी
३ अ. ‘पू. (सौ.) माला कुमार नेहमी उत्साही आणि आनंदी असतात.
३ आ. त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणा हा मोठा गुण आहे. त्यांची प्रत्येकच वस्तू व्यवस्थित ठेवलेली असते.
३ इ. प्रीती : काही दिवसांपूर्वी मला बरे वाटत नव्हते. तेव्हा त्या मधून मधून मला भ्रमणभाष करून माझ्या प्रकृतीची विचारपूस करायच्या. नंतर त्या देहली सेवाकेंद्रात मला भेटायलाही आल्या.
३ ई. सेवेची तळमळ : त्यांना कितीही शारीरिक त्रास होत असला, तरीही त्या त्यांच्याकडे असलेल्या सेवा पूर्ण करतात. त्या इतरांनाही त्यांच्या सेवांमध्ये साहाय्य करतात.
३ उ. त्या सेवेचे साहित्य अत्यंत भावपूर्णरित्या ठेवतात.’ (२३.१२.२०२१)