भंडारा जिल्ह्यातील एका महिलेला फसवून ३ जणांकडून कन्हाळमोह जंगलात बलात्कार
भंडारा – बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने घरातून बाहेर पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन ३ जणांनी बलात्कार केला. तिला निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. पीडित महिलेवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार चालू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिला रस्त्याने पायी जात असतांना श्रीराम उरकुडे याने घरी सोडण्याचे आश्वासन देऊन मुंडिपार जंगलात नेऊन २ दिवस तिच्यावर बलात्कार करून जंगलात सोडून तो निघून गेला. पीडित महिलेने तेथील रस्त्यावरील पंक्चर दुरुस्ती करणार्या व्यक्तीला पाणी मागितले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अन्य एका युवकाने ‘दुचाकीवरून घरी सोडतो’, असे सांगितल्यावर महिलेने नकार देऊनही पंक्चर दुरुस्ती करणार्या व्यक्तीने तिला विश्वास ठेवून दुचाकीवर बसण्यास सांगितले; मात्र युवक तिला जंगलात घेऊन गेला तिथे दोघांनी महिलेवर परत बलात्कार केला. पीडित महिलेला कन्हाळमोह जंगलात निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून त्यांनी पळ काढला. त्यानंतर अन्य एका दुचाकीचालकाने तिला पाहिले आणि गावात आणले. गावातील महिलांनी तिला कपडे दिले. पोलिसांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले.
संपादकीय भूमिकाधर्माधिष्ठित राष्ट्रातच महिला सुरक्षित जीवन जगू शकतात, हे लक्षात घ्या ! |