मीरारोड येथे खंडणीसाठी अपहृत मुलाची हत्या करणार्या दोघा धर्मांधांना अटक !
ठाणे, ४ ऑगस्ट (वार्ता.) – २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी १३ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करणारे अफझल अन्सारी (वय २२ वर्षे) आणि इम्रान शेख (वय २४ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येची घटना मीरारोड येथे घडली आहे. मृत मुलाच्या मित्रांनीच पैशांसाठी त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात उघड झाले आहे. (धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचे भयच उरले नसल्याचेच हे उदाहरण ! – संपादक) या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहेत.