उमेश कोल्हे हत्याप्रकरणी एन्.आय.ए.कडून आणखी २ आरोपींना अटक !
अमरावती – येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या)पथकाने ३ ऑगस्ट या दिवशी आणखी २ आरोपींना अटक केली आहे. मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (वय ४१ वर्षे) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (वय २३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी २१ जून या दिवशी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात निधीसंकलन करणे आणि इतर आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप या २ आरोपींवर ठेवण्यात आला आहे. ‘एन्.आय.ए.’च्या पथकाने आरोपींची चौकशी चालू केली असून आरोपींच्या घरांची झडती घेतली जाण्याची शक्यता आहे.