सनातन पुनर्नवा चूर्ण
सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘मूत्रवहनसंस्थेच्या विकारांमध्ये या औषधाचा वापर होतो. मूतखडा, ‘मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू न्यून होणे किंवा मूत्रपिंड निकामी होणे (सीकेडी – क्रॉनिक किडनी डिसीज)’, अंगावर सूज येणे इत्यादी विकारांमध्ये याचा लाभ होतो. १ मास प्रतिदिन १ चमचा (३ ग्रॅम) चूर्ण दिवसातून २ – ३ वेळा अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून प्यावे. यामुळे लघवी चांगल्या प्रकारे होते, तसेच पोट साफ होण्यासही साहाय्य होते.
मूतखड्यावर हे चूर्ण घेत असतांना मूतखडा फुटण्यासाठी आहारात कुळीथ ठेवावेत. कुळिथाचे पिठले, सार, उसळी इत्यादी पदार्थ बनवून खावेत. काहींना कुळीथ खाऊन आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. तसे झाल्यास कुळीथ बंद करावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)
‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.