अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात पुन्हा युद्धाला प्रारंभ
नवी देहली – अझरबैजान आणि अर्मेनिया या दोन देशांमध्ये पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला आहे. अझरबैजानने केलेल्या आक्रमणात अर्मेनियाचे दोन सैनिक ठार झाले आहेत. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने वादग्रस्त नागोर्नो-काराबाख भागातील अनेक डोंगरांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. अर्मेनियाच्या सैनिकांनीही या भागामध्ये अझरबैजानच्या एका सैनिकाला ठार मारल्याने दोन्ही देशात तणाव वाढला आहे. या युद्धात अर्मेनियाचे १९ सैनिक घायाळही झाले असून यांतील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या भागामध्ये रशियाचे शांतीसैन्यदेखील तैनात आहे. अझरबैजानने ३ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. या दोन्ही देशांमध्ये यापूर्वी १९९०च्या दशकात, तसेच वर्ष २०२० मध्येही युद्ध झाले होते.