केरळमध्ये जिलेटिनच्या ८ सहस्र कांड्या जप्त !
खणन कामासाठी वापरणार असल्याचा पोलिसांचा अंदाज !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील शोरनूर येथे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ४० बेवारस खोकी जप्त केली आहेत. यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल ८ सहस्र कांड्या लपवण्यात आल्या होत्या.
#Kerala explosive haul: 8,000 gelatin sticks found abandoned in #Palakkad#keralanews https://t.co/Rzx9aPL3iG
— India TV (@indiatvnews) August 4, 2022
या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. ही स्फोटके एका खाणीजवळ मिळाली. त्यामुळे खणन कार्य करण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार होता का, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके नेमकी कोणत्या कारणासाठी वापरली जाणार होती ? ती अशी बेवारस ठेवण्यामागे काय उद्देश आहे, याचेही अन्वेषण होणे आवश्यक ! |