बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !
पालकांनी खडसवल्यावर शाळेच्या व्यवस्थापकांनी मागितली क्षमा !
मुलांना ॲलर्जी होऊ नये; म्हणून मेंदी लावून न येण्याचा नियम !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील ख्रिस्ती मिशनरींच्या ‘सेंट ज्यूस स्कूल’ शाळेमध्ये मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला खडसावून शिक्षा केल्यामुळे येथे वाद निर्माण झाला. या प्रकरणी मुलीचे पालक शाळेत गेल्यावर शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांची क्षमा मागितली.
१. आयुष अग्रवाल यांच्या या मुलीच्या शाळेच्या दैनंदिनीमध्ये शिक्षकाकडून लिहिण्यात आले होते की, ती मेंदी लावून शाळेत आली होती. पुन्हा अशी कृती होऊ नये. याविषयी पालकांनी मुलीला विचारल्यावर तिने शिक्षिका ओरडल्याचे आणि शिक्षा केल्याचे सांगितले.
२. यानंतर आयुष अग्रवाल, तसेच स्थानिक आमदार संजीव अग्रवाल यांचे भाऊ प्रदीप अग्रवाल आणि काही पालक शाळेत गेले. त्यांनी व्यवस्थापक रॉबर्ट यांची भेट घेतली. तेव्हा रॉबर्ट म्हणाले, ‘मुलांना ॲलर्जी होऊ नये; म्हणून आम्ही या संदर्भात नियम बनवला आहे’; मात्र पालकांना हे पटले नाही. त्यांना विरोध केल्यावर रॉबर्ट यांनी त्यांची क्षमा मागितली.
३. येथील ‘रुहेलखंड पालक सेवा समिती’चे अध्यक्ष विशाल मेहरोत्रा यांनी सांगितले की, येथे सणाच्या निमित्ताने मुलीला मेंदी लावण्यात आली होती. यात तिची काहीच चूक नसतांना तिला शिक्षा करण्यात आली. आम्ही या विरोधात शिक्षण अधिकार्यांकडे तक्रार केली आहे.
संपादकीय भूमिकाॲलर्जीच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांचा विरोध करण्याची ही ख्रिस्ती मिशनरींच्या शाळांची पद्धत आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !
|