देहलीतील दंगलीच्या प्रकरणातील धर्मांधाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
नवी देहली – येथील जहांगीरपुरी भागात १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या वेळी झालेल्या हिंसाचारातील पसार आरोपी सांवर मलिक उपाख्य अकबर उपाख्य कालिया याला पकडण्यासाठी जहांगीरपुरी भागात गेले असता स्थानिक मुसलमानांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात एक पोलीस हवालदार घायाळ झाला. त्यानंतरही पोलिसांनी अकबर याला अटक केली. त्याला पकडून देणार्यास २५ सहस्र रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा यापूर्वी पोलिसांनी केली होती. या दंगलीत ८ पोलीस घायाळ झाले होते. आतापर्यंत या प्रकरणी ३५ जणांसह ३ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पुलिस की अपराध शाखा ने जहांगीरपुरी सांप्रदायिक हिंसा के सिलसिले में एक व्यक्ति को गिरफ्तार किया है-#DelhiNews #Jahangirpuri #DelhiPolicehttps://t.co/ZAqcLlUkvG
— ABP News (@ABPNews) August 3, 2022
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल भागात धर्मांध आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नेहमीच आक्रमणे होतात, हे आता नवीन राहिलेले नाही; मात्र याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत ! |