पुण्याच्या शिवसेना शहरप्रमुखांसह ५ जणांना अटक !
आमदार उदय सामंत यांच्या वाहनावरील आक्रमणाचे प्रकरण
पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील दौर्यामध्ये आमदार उदय सामंत हेही सहभागी झाले होते. उदय सामंत यांचे वाहन कात्रज चौकात आल्यानंतर त्यांच्या वाहनावर आक्रमण होऊन गाडीची काच फुटली. या आक्रमणात गाडीतील एक व्यक्ती घायाळ झाली होती. या घटनेनंतर उदय सामंत यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यावर आक्रमणकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे.