पुणे येथे ६ मासांत बलात्काराचे १७५, तर विनयभंगाचे २९५ गुन्हे नोंद !
पुणे – विवाहितेला क्रूर वागणूक देणे, बलात्कार, विनयभंग आणि अपहरण यांच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. मागील ६ मासांत बलात्काराचे १७५, तर विनयभंगाचे २९५ आणि अपहरणाचे ४०३ गुन्हे नोंद झाले आहेत. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमीष दाखवत पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये लैंगिक अत्याचार करून मुली गर्भवती होण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
सामाजिक माध्यमांवर महिला आणि तरुणी यांच्याशी ओळख वाढवून त्यांना लग्नाचे आमीष दाखवले जाते. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसेच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत. महिला, अल्पवयीन मुली यांच्यावरील अत्याचारांना आळा बसावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून, कायदे अधिक कठोर केले आहेत. असे असतांनाही अत्याचाराच्या घटना काही थांबत नाहीत. (आजही एखादी पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेल्यावर तिची तक्रार नोंदवली जात नाही. अनेकदा पीडितेला पोलिसांकडूनच अपमानास्पद वागणूक दिली जाते. न्यायालयात पीडित महिलांना न्यायासाठी वर्षानुवर्षे ताटकळत रहावे लागते. जोपर्यंत यंत्रणेतील या त्रुटी काढल्या जात नाहीत, तोपर्यंत कितीही नवीन कायदे आले, तरी त्यांची प्रभावीपणे कार्यवाही केल्याविना गुन्हेगारी थांबू शकत नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|