सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
श्रीगुरु करती प्रेम जिवापाड ।
श्रीगुरु (टीप १) करती
प्रेम जिवापाड ।
आहे हो मी एक पामर मूढ ।। १ ।।
निर्माण करतात
साधनेची चाड (टीप २) ।
पर मला वाटते ते अवघड ।। २ ।।
नाही कळत मज त्यातील गूढ ।
मी आहे एक पामर मूढ ।। ३ ।।
तुम्ही सांगता साधनेचे मूळ ।
तरी आहे मी धन्य धन्य मूढ ।। ४ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – गोडी
– श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.५.२०२१)