‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी एस्.टी. महामंडळ सज्ज
मुंबई – ‘हर घर तिरंगा’ अभियानामध्ये एस्.टी. महामंडळाचे सर्व आगार आणि बसस्थानके यांवरील ध्वनीक्षेपकावरून धून आणि ध्वजगीत वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. महामंडळाचे ९० सहस्र अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात सर्व प्रमुख बसस्थानकांवर विद्युत् रोषणाई करण्यात येणार आहे. रांगोळी काढून सर्व बसस्थानके सजवण्यात येत आहेत. उत्सवाचे निमित्त साधून ९ ते १६ ऑगस्ट या कालावधीत राज्य परिवहन मंडळामध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सामूहिक प्रयत्नांतून बसस्थानके स्वच्छतागृहे आणि बस यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.