मनसे कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याचा दावा खोटा ! – योगेश चिले, पनवेल शहराध्यक्ष
नवी मुंबई – पनवेलमधून १०० मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी दिली आहे. मनसेच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांना फसवून तिथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांचे शिंदे यांच्यासह छायाचित्र काढण्यात आले, असे चिले यांनी म्हटले आहे.