मित्राविरुद्ध बलात्काराची तक्रार करू नये यासाठी केदार दिघे यांच्याकडून महिलेला धमकी !
मुंबई – शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर ‘बलात्कार करणार्या मित्राची तक्रार करू नये, यासाठी एका महिलेला धमकी दिल्याचा’ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. एन्.एम्. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूर यांनी बलात्कार केला आहे; तर केदार दिघे यांनी तक्रार करू नये; म्हणून धमकावले आहे.