भाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची कारवाई झालेली दाखवा अन् १ लाख मिळवा !
संभाजीनगर शहरात झळकले फलक !
संभाजीनगर – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी शहरातील क्रांती चौक येथे भाजपच्या विरोधात फलक लावले आहेत. ‘भाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची कारवाई झाल्याचे अन् भाजप पक्षात गेलेल्या नेत्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि १ लाख रुपये मिळवा’, असे फलकावर लिहिण्यात आले आहे.
अक्षय पाटील म्हणाले की, या देशात ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. अनेक राज्यांत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर करत आहेत. आज देशात ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांचे प्रमुख भाजपच्या घरगड्यांप्रमाणे वागत आहेत. ईडी ही भाजपची दुसरी शाखाच झाली आहे.