जगभरातील अमेरिकी नागरिकांवर आतंकवादी आक्रमणांची शक्यता !
अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर अमेरिकेकडून चेतावणी !
वॉशिंग्टन – अमेरिकेने अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर आता अमेरिकी विदेश विभागाने जगभरातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. ‘अल्-कायदाचे समर्थक अथवा त्याच्याशी संबंधित आतंकवादी संघटना या अमेरिकी अधिकारी अथवा नागरिक यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू शकतात’, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकी नागरिकांना विशेषकरून विदेश प्रवास करतांना अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. यासमवेतच आतंकवादी हे अमेरिकेच्या मित्र देशांनाही लक्ष्य करू शकतात, असे सांगून संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणा यांना अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.