इजिप्तमध्ये सापडले ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर !
कैरो (इजिप्त) – इजिप्तच्या पुरातत्व विभागाने येथील अबुसीर भागात एक प्राचीन सूर्यमंदिर शोधून काढले आहे. हे मंदिर अनुमाने ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वींचे असल्याचा दावा केला जात आहे. ‘कच्च्या विटांपासून बनवलेले हे मंदिर या देशातील ५ व्या साम्राज्याच्या काळातील असावे’, असे मानले जाते. इजिप्तमध्ये यापूर्वीही ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वीच्या एका सूर्यमंदिराचे अवशेष सापडले होते. सरकारचे म्हणणे आहे की, हे मंदिर ५ व्या सम्राज्याच्या शोधण्यात आलेल्या अन्य मंदिरांपैकीच एक असू शकते. याचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख आहे.