आसाममध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी विवाह : बलपूर्वक गोमांस खण्यासाठीही दबाव
पोलिसांकडून मुसलमान तरुणाला अटक
गौहत्ती (आसाम) – येथे विवाहित मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल शाहजहान असे त्याचे नाव असून त्याने ‘मिंटू रॉय’ असे हिंदु नाव सांगून या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यांचा विवाह प्रसिद्ध कामाख्या मंदिरात झाला होता. ६ मासांनंतर या तरुणीला त्याची खरी ओळख समजली. या काळात त्याने तिच्याकडून तिच्याकडील सर्व पैसे काढून घेतले आणि अन्य एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
हिंदु महिलांना मुसलमान पुरुषांशी विवाह करू नये ! – पीडित हिंदु तरुणी
या घटनेविषयी या तरुणीने सांगितले की, ‘हिंदु महिलांनी मुसलमान पुरुषांशी विवाह करू नये’, असे मी आवाहन करू इच्छिते. त्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून सावध राहिले पाहिजे. ते (मुसलमान पुरुष) काही दिवस तुमच्याशी चांगले वागतील आणि नंतर तुमचा शारीरिक छळ करतील, तसेच तुमचे जेवणही बंद करतील.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा घटना थांबत नाहीत. यावरून ‘धर्मांधांना कायद्याचे भय नसते’, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अशांना आता हिंदु तरुणीचे जीवन उद्ध्वस्त केल्यावरून फाशीची शिक्षा करण्यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |