ताजमहलच्या मागील बाजूस हिंदु महासभेकडून जलाभिषेक : १८ कार्यकर्त्यांना अटक
आगरा (उत्तरप्रदेश) – श्रावणी सोमवारी ताजमहाला प्रदक्षिणा घालून मागच्या बाजूला जलाभिषेक करण्याची घोषणा करणार्या हिंदु महासभेच्या १८ कार्यकर्त्यांना आगरा पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. हिंदु महासभेच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, जलाभिषेक करणे, हा गुन्हा नाही. पोलिसांनी अशा प्रकारे जलाभिषेक करण्यापासून रोखणे चुकीचे आहे.
ताजमहल को तेजो महालय मानकर जल चढ़ाने वाले हिंदू महासभा के पदाधिकारियों को पुलिस ने हिरासत में लिया.#Tajmahal https://t.co/psVVk7Aa0C
— AajTak (@aajtak) August 2, 2022
हिंदु महासभेचा एक कार्यकर्ता म्हणाला की, हे ताजमहाल नाही, तर तेजोमहालय मंदिर आहे. त्यासाठी आम्ही आमची लढाई लढत राहू.