राज्य सरकारकडून ‘स्वाईन फ्ल्यू’च्या १ लाख लसींची खरेदी
मुंबई – राज्यातील ‘स्वाईन फ्ल्यू’चा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने फ्ल्यूच्या १ लाख लसींचा साठा खरेदी केला आहे. प्राधान्याने गर्भवती महिला, आरोग्य कर्मचारी अशा जोखमीच्या गटांसाठी ही लस जिल्ह्यांना पाठवण्यात येणार आहे, असे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
राज्यात जुलै मासापासून स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या १७३ च्याही पुढे गेली आहे. तसेच ९ जणांचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिला, ६५ वर्षांवरील व्यक्ती, दमा, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, चेतासंस्थेचे विकार इत्यादी दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, दीर्घकाळ औषधे घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अल्प झालेले रुग्ण आणि अतिस्थूल व्यक्ती यांना स्वाईन फ्ल्यूचा अधिक धोका आहे. या आजारापासून प्रतिबंध होण्यासाठी इंजेक्शनद्वारे द्यायची आणि नेसल स्प्रे स्वरूपातील लस उपलब्ध आहे.