नाशिक येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण करणार्या चौघांना अटक !
नाशिक – जिल्ह्यात लहान मुलींचे अपहरण करून त्यांना परराज्यात विकणार्या टोळीला ओझर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात २ महिला आणि २ पुरुष आरोपी आहेत. संशयित आरोपींनी पंचवटी, सातपूर आणि फुलेनगर येथील मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे मान्य केले आहे. ओझर गुन्हे शोध पथक ५ दिवस गुजरात आणि मध्यप्रदेश येथे तळ ठोकून होते. पोलिसांनी याला ‘ऑपरेशन मुस्कान’ नाव दिले होते. ज्या मुलींचे अपहरण करण्यात आले होते, यामध्ये १० ते १२ वयोगटांतील मुलींचा समावेश होता. ओझर येथीलच एक महिला पैशांसाठी हे अपहरणाचे काम करत असल्याचे उघडकीस आले आहे.
संपादकीय भूमिकाआरोपींना कठोर शासन झाल्याविना अपहरणाच्या घटना थांबणार नाहीत ! |