राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !
ठाणे, २ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात ‘राजस्थानी आणि गुजराती नसतील, तर मुंबईत पैसाच रहाणार नाही’, असे म्हटले होते. या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ झाला. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला; मात्र ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यासह सहस्रो कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.