दैवी बालकांनी शालेय पाठ्यक्रमातील इतिहासाच्या विकृतीकरणाला केलेला कृतीशील विरोध !
एकदा दैवी बालकांनी त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतील हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या विरोधातील लिखाणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माहिती दिली.
१. दैवी बालसाधकांनी पाठ्यपुस्तकांतील अयोग्य लिखाणाच्या विरोधात केलेल्या कृती !
दैवी बालसाधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘‘आम्ही हिंदु धर्म आणि भारत देश यांविषयी ज्या पाठ्यपुस्तकांत अयोग्य इतिहास आहे, त्याविषयी संबंधित शिक्षकांना सांगितले. आम्ही पुस्तकांतील अयोग्य सूत्रांचे खंडण केले आणि शिक्षकांना योग्य सूत्रे सांगितली.’’
२. तेव्हा ‘देवाने विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर या दैवी बालकांच्या माध्यमांतून इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधातील अभियान चालू करून सूक्ष्म लढ्याचा आरंभच केला आहे’, असे मला जाणवले.
३. दैवी बालकांचा धर्माभिमान आणि देशाभिमान !
‘दैवी बालकांनी स्वतःचे शालेय जीवन किंवा भविष्य यांविषयी जराही काळजी न करता किंवा ‘शिक्षक अनुत्तीर्ण करतील’ याची भीती न बाळगता भगवंताप्रती निस्सीम श्रद्धा ठेवून आणि देवता, धर्म अन् भारत देश यांविषयी भाव ठेवून निर्भयतेने धर्म आणि राष्ट्र यांविषयीच्या सूत्रांच्या विरोधात एका प्रकारे जागृती केली आहे’, असे मला जाणवले.
४. परात्पर गुरुदेव पूर्वीपासूनच ‘दैवी बालके पुढे हिंदु राष्ट्र चालवणार आहेत’, असे सांगत आहेत. त्यांच्या या उद्गारांची मला या प्रसंगात प्रचीती आली.
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती