आयुर्वेदातील प्राथमिक उपचार
डोकेदुखी
‘सूतशेखर रस’ या औषधाच्या एका गोळीचे बारीक चूर्ण करावे. (एका ताटलीत गोळी ठेवून तिच्यावर पेल्याने किंवा वाटीने दाब दिल्यास गोळीचे चूर्ण होते.) हे चूर्ण तपकीर ओढतात त्याप्रमाणे नाकात ओढावे. असे करणे जमत नसल्यास चमचाभर पातळ तुपामध्ये हे गोळीचे चूर्ण मिसळावे. उताणे झोपून या तुपात मिसळलेल्या औषधाचे २ – २ थेंब दोन्ही नाकपुड्यांत घालून २ मिनिटे पडून रहावे. त्यानंतर उठून तुपात मिसळलेले बाकीचे औषध चाटून खावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२२)
सनातनचे ‘सूतशेखर रस’ हे औषध आता उपलब्ध आहे. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे. |