बिबवेवाडीत (पुणे) ८ जुगार अड्ड्यांवर धाड !
९४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद
पुणे – शहरात लॉटरीच्या नावाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई चालू केली आहे. बिबवेवाडी भागातील ८ जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकून ८४ सहस्र ९३० रुपये, ३२ भ्रमणभाष संच, २७ दुचाकी वाहने असा १९ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे : बिबवेवाडीत आठ जुगार अड्ड्यांवर छापा ; ९४ जणांच्या विरोधात गुन्हा
|https://t.co/BxjbyfnOKB#pune #gambling #raided #crime #news— LoksattaLive (@LoksattaLive) July 31, 2022
या प्रकरणी लॉटरी दुकानाचे मालक आणि कामगार यांसह ९४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जुगार खेळणार्यांना आकर्षित करण्यासाठी ‘आओ चलो खिलाडी, खेल शुरू है बिबवेवाडी’ असे संदेश पाठवण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाशहरात राजरोसपणे जुगार अड्डे चालू रहाणे, हे पोलीसयंत्रणेचे अपयश नव्हे का ? |