कुराणऐवजी हनुमान चालीसाचे पठण केल्याने दोघा हिंदु विद्यार्थ्यांना अयोध्येतील मुसलमानांच्या महाविद्यालयाने काढले !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील फैजे आम मुस्लिम महाविद्यालयातील दोन हिंदू विद्यार्थ्यांना हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांपैकी एकाचे म्हणणे आहे की, त्यांना कुराण वाचण्यास सांगितले जात होते. त्यांनी याऐवजी हनुमान चालीसाचे पठण केले, त्यामुळे त्यांना काढण्यात आले, तर दुसर्या विद्यार्थ्याला हे ठाऊकच नाही की, त्याला महाविद्यालयातून का काढून टाकण्यात आले आहे ?
अयोध्या के मुस्लिम इंटर कॉलेज ने दो छात्रों का नाम काटा; स्टूडेंट बोले- हनुमान चालीसा पढ़ने पर स्कूल से निकाला, मैनेजमेंट ने बच्चों पर धार्मिक उन्माद फैलाने का लगाया आरोप#Hanuman #UttarPradesh https://t.co/gHOTdT76n3
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) August 2, 2022
१. सौरव यादव या ११ वीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, तो वर्गामध्ये रहीमचे दोहे (ओव्या) वाचत होता. तेव्हा मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेत त्याला कुराण वाचण्यास सांगितले. ते अकबर बादशाहाचे कौतुक करू लागले. यावर सौरव रामायण आणि हनुमान चालीसा वाचू लागला. मुसलमान विद्यार्थ्यांनी या गोष्टीची तक्रार महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला केली. त्यानंतर व्यवस्थापनाने त्याला महाविद्यालयातून काढून टाकले.
२. सौरव यादव प्रमाणेच माधवेंद्र प्रताप सिंह याचेही नाव काढून टाकण्यात आले आहे. माधवेंद्र याचे म्हणणे आहे की, मला या घटनेची कोणतीही माहिती नाही. तरीही माझे नाव काढण्यात आले आहे. मी वर्गात बसून गृहपाठ करत होतो. या काळात काय झाले मला काहीच ठाऊक नाही.
३. महाविद्यालयाचे व्यवस्थापक महंमद अख्तर सिद्दीकी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी केलेले दावे फेटाळले आहेत. त्यांनी याला ‘षड्यंत्र’, असे म्हटले आहे. ‘महाविद्यालयाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे ते म्हणाले.
४. विश्व हिंदु परिषदेचे प्रांतीय माध्यम प्रमुख शरद शर्मा यांनी या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि व्यवस्थापक यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ‘जर ३ दिवसांत कारवाई झाली नाही, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सूत्र उपस्थित करण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
५. जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी ‘या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|