केरळमधील सनदी अधिकारी श्रीराम वेंकटरमण यांच्या नियुक्तीला मुसलमानांचा विरोध
सहस्रोंच्या संख्येने मोर्चा !
थिरूवनंतपूरम् – केरळमधील आय.ए.एस्. (सनदी) अधिकारी श्रीराम वेंकटरमण यांची ‘अलाप्पुझा’ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यास सुन्नी मुसलमानांनी तीव्र विरोध दर्शवला. या निर्णयाच्या विरोधात मुसलमानांच्या अनेक संघटनांनी येथील मंत्रालय, तसेच सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला. या वेळी मुसलमानांनी ‘वेंकटरमण हे पत्रकार के.एम्. बशीर यांच्या मृत्यूच्या प्रकरणी आरोपी असल्याने त्यांची नियुक्ती रहित करावी’, अशी मागणी केली.
जिले का DM कौन हो/न हो … मुस्लिम भीड़ कर रही तय: केरल में IAS श्रीराम वेंकटरमण की पोस्टिंग के खिलाफ हजारों मुस्लिम सड़क पर#Kerala https://t.co/gqNlaF2Cwj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 1, 2022
दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी वेंकटरमण यांची योग्य जागीच नियुक्ती केली असल्याचे सांगत वेंकटरमण यांचा बचाव केला. याउलट काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल यांनी वेंकटरमण यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे.