बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट !
दोन सहस्र रुपयांच्या नोटांविषयी केंद्र सरकारकडून धोक्याची चेतावणी
नवी देहली – तुमच्याकडे २ सहस्र रुपयांची नोट असल्यास सावध व्हा. २ सहस्र रुपयांची नोट खरी आहे कि खोटी ते तपासून घ्या. बनावट नोटांची आकडेवारी देत मोदी सरकारने हे आवाहन केले आहे. वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ (एन्.सी.आर्.बी.) ने दिलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची संख्या वाढली आहे.
अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बनावट नोटांविषयी महत्त्वाची माहिती दिली.
देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढले ! – भारतीय रिजर्व बँक
मे मासामध्ये भारतीय रिजर्व बँकेने एक अहवाल सिद्ध केला. यामध्ये देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी भारतीय रिझर्व बँकेने दिली. ‘२०२१-२२ मध्ये बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण तब्बल १०१.९ टक्क्यांनी वाढले आहे, तर २ सहस्र रुपयांच्या नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढले आहे’, असे ‘आर्.बी.आय.’ ने अहवालात म्हटले आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंत चलनात असलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ८७.१ टक्के होते. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक होते. यानंतर १० रुपयांच्या नोटांचा नंबर लागतो. बाजारात असलेल्या एकूण चलनांत १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २१.३ टक्के आहे.
संपादकीय भूमिका
|