संजय राऊत यांच्यानंतर अनिल परब कारागृहामध्ये जाणार ! – किरीट सोमय्या, भाजप नेते
मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर लवकरच परिवहनमंत्री अनिल परब यांनाही अटक होऊ शकते, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असणारे संजय राऊत जसे कारागृहामध्ये गेले, तसा डावा हातही (अनिल परब) कारागृहामध्ये जाईल. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उजवा हात नवाब मलिक आणि डावा हात अनिल देशमुख सध्या कारागृहामध्ये आहेत. ‘अनिल परब यांनी त्यांचे अवैध हॉटेल तोडले नाही. हा पैसा कुठून आला ?, याचे अन्वेषण चालू आहे. दापोली न्यायालयात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी याचिका प्रविष्ट झाली आहे. त्याचा अंतिम निकाल १७ ऑगस्ट या दिवशी आहे’, असे सोमय्या यांनी सांगितले.