२ अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या प्रकरणी २ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद !
कुंभारी विडी घरकुल (जिल्हा सोलापूर) येथील प्रकार
वळसंग (जिल्हा सोलापूर) – कुंभारी विडी घरकुलमधील २ अल्पवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात २ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विडी घरकुल ‘क’ विभागातील २ अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (लहान वयात मुलांमधील वाढत चाललेली वासनांधता रोखण्यासाठी बालवयापासूनच त्यांना धर्मशिक्षण देऊन संस्कार करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! – संपादक)