पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या खोलीत ठेवलेले तुळशीचे रोप पुष्कळ बहरलेले असूनही त्याची पाने खाली झुकलेली असणे
१. पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या खोलीतील तुळशीचे रोप चांगले बहरलेले असूनही त्याची पाने खाली झुकलेली असणे
‘खोलीत तुळशीचे रोप ठेवावे’, अशी पू. पिताजींची (वडील पू. भगवंत कुमार मेनराय यांची) इच्छा होती. १३.११.२०२१ या दिवशी पू. पिताजींच्या खोलीत एक छोटेसे तुळशीचे रोप ठेवले. केवळ ६ मासांत तुळस पुष्कळ वाढली. तुळस चांगली वाढलेली असूनही तिची पाने खाली झुकलेली आहेत. त्यामुळे मी ती तुळस रामनाथी आश्रमातील लागवडीत सेवा करणारे साधक श्री. दादा कुंभार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना दाखवली.
२. काही साधकांच्या खोलीतील तुळशीची रोपे फारशी न वाढणे; मात्र पू. मेनराय यांच्या खोलीतील तुळस चांगली वाढली असल्याचे साधकाने सांगणे
खोलीतील तुळस पाहून श्री. दादा कुंभार यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘तुळशीचे रोप किती चांगले वाढले आहे ! काही मासांपूर्वी इतर साधकांच्या खोलीतही तुळशीची रोपे ठेवली होती; परंतु ‘ती रोपे फारशी वाढली नाहीत’, असे मला आढळून आले.’’
३. ‘तुळशीच्या रोपाची पाने खाली झुकलेली असण्यामागे काय कारण असावे ?’, असा प्रश्न मनात येणे
तुळशीचे रोप पुष्कळ चांगले वाढत आहे आणि त्याची पानेही चांगली आहेत; परंतु ती पाने खाली झुकलेली असतात. ‘यामागे स्थुलातील कारण आहे कि काही आध्यात्मिक कारण आहे ?’, हे कळावे’, यासाठी मी हा प्रश्न कु. मधुरा भोसले यांना विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर खालील लेखात दिले आहे. ’
लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/601551.html
– श्री गुरुचरणी समर्पित, सुश्री (कु.) संगीता मेनराय (पू. मेनराय यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०२२)
पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या खोलीत ठेवलेल्या तुळशीच्या रोपाकडे पाहून सनातनच्या संतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. ‘या तुळशीच्या रोपाकडे पहातांना पू. मेनरायकाकांना पुढील दृश्य दिसते, ‘वासुदेव मथुरेहून यमुनेच्या पाण्यातून बाळकृष्णाला डोक्यावर ठेवलेल्या टोपलीतून गोकुळात घेऊन जात आहे आणि शेषनागाने बाळकृष्णावर आपल्या फण्यांचे छत्र धरले आहे.’
२. पू. मेनरायकाकांना तुळशीकडे पाहून कधी कधी ‘शिव तांडव नृत्य करत आहे’, असे दिसते.
३. सद्गुरु पिंगळेकाकांना तुळशीच्या सरळ खोडाकडे पाहून ‘ती वृंदवृंद ऋषींची सुषुम्ना नाडी आहे’, असे जाणवले.
४. आम्ही तुळशीविषयी बोलत असतांना सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ यांना ‘तुळस आनंदाने डोलत आहे’, असे दिसले.’
– सुश्री (कु.) संगीता मेनराय (पू. मेनराय यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |