४० वर्षांपासून रहाते घर सोडतांनाही अत्यंत स्थिर रहाणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. पुष्पा पराडकर (वय ७३ वर्षे) !
श्रावण शुक्ल पंचमी (२.८.२०२२) या दिवशी सौ. पुष्पा माधव पराडकर यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेले त्यांची गुणवैशिष्ट्य येथे देत आहोत.
सौ. पुष्पा माधव पराडकर यांना सनातन परिवाराच्या वतीने ७३ व्या वाढदिवसानिमित्त नमस्कार !
‘मे २०२२ मध्ये आम्ही डिचोली, गोवा येथील रहाते घर विकून खोतोडे, सत्तरी येथे रहायला आलो. डिचोली येथील घरामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले येऊन गेले होते, तसेच आमच्या घराजवळच आईचे माहेरही आहे. त्यामुळे जवळच्या नातेवाइकांचे नेहमी घरी येणे-जाणे असे. आईची सर्वांशी जवळीक आहे. आई-बाबा ४० वर्षांपासून त्या घरात रहात होते. अनेक नातेवाइकांना ‘आम्ही घर सोडतांना आईला वाईट वाटेल’, असे वाटले होते; परंतु आई या प्रसंगात अत्यंत स्थिर होती. तिला कोणतीही आसक्ती नव्हती. त्यामुळे घर सोडल्याचे तिला काहीही वाटले नाही.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर (सौ. पुष्पा माधव पराडकर यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२२)