माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
कोल्हापूर, १ ऑगस्ट (वार्ता.) – माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात सहकुटुंब जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. मनोज नरवणे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आले आहेत. या प्रसंगी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाइकवाडे यांसह अन्य उपस्थित होते.