धर्मांधांनी झारखंडमधील ५ सरकारी शाळा बंद करण्यास भाग पाडले !
शुक्रवारऐवजी रविवारी सुटी देण्याच्या सरकारी निर्णयाला विरोध
रांची (झारखंड) – राज्यातील सर्व शाळांना रविवारीच सुटी देण्याचे झारखंडचे शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांच्या आदेशांनतरही पलामू जिल्ह्यातील काही मुसलमानबहुल भागांत हा आदेश धुडकावण्यात आला. सरकारी आदेशानुसार जिल्ह्यातील नवाबाजार आणि विश्रामपूर या मुसलमानबहुल भागांतील ५ सरकारी शाळा शुक्रवार, २९ जुलै या दिवशी सुटी न देता चालूच ठेवण्यात आल्या होत्या; मात्र धर्मांधांनी विश्रामपूर येथील ४ सरकारी शाळा बंद करण्यास भाग पाडले. या वेळी शिक्षकांनी धर्मांधांना शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, तसेच उच्च शिक्षणाधिकार्यांशी संपर्कही साधून दिला; मात्र धर्मांधांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
स्कूलों में साप्ताहिक अवकाश को लेकर विवाद जारी है, इसी बीच रांची में कांके के चंदवे राजकीय मध्य विद्यालय में भी शुक्रवार को जारी साप्ताहिक छुट्टी को बदलकर रविवार कर दिया गया है. pic.twitter.com/hn4HDwhVH2
— News18 Jharkhand (@News18Jharkhand) July 27, 2022
धर्मांधांनी एका शाळेला स्वत:च टाळे ठोकून शिक्षकांना बाहेर उभे केले !
नवाबाजार येथील एका शाळेतही असेच चित्र पहायला मिळाले. डिहरिया येथील एका शाळेला तर धर्मांधांनी स्वत:च टाळे ठोकून शिक्षकांना बाहेर उभे केले. येथील सरकारी पदाधिकारी मणि कुमार पांडेय यांनी अशा प्रकारे शाळा बलपूर्वक बंद पाडण्याच्या घडलेल्या घटनांना दुजोरा दिला आहे. यासह त्यांनी ‘शाळांना रविवारीच सुटी असेल’, असेही स्पष्ट केले.
पलामू जिल्ह्यात ४९ शाळांच्या नावांमध्ये अनधिकृतरित्या जोडण्यात आला ‘उर्दू’ शब्द !एका अहवालानुसार पलामू जिल्ह्यात एकूण २० उर्दू शाळा आहेत. तथापि अन्य ४९ शाळांच्या नावांमध्येही अनधिकृतरित्या ‘उर्दू’ शब्द जोडून या सर्व शाळांना ‘शुक्रवारी’ सुटी घोषित करण्यात आली होती. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी उपेंद्र नारायण यांनी या शाळांच्या नावांमधून ‘उर्दू’ शब्द काढण्यासह शाळा शुक्रवारीही चालूच ठेवण्याचा आदेश दिला. (प्रसारमाध्यमांमधून बातम्या प्रसारित झाल्यावर जागे होणारे जिल्हा शिक्षणाधिकारी ! अशांंवर आता सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|